Mauli Videos

Tuesday, March 9, 2010


संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमि साठी पैठन आपेगांव तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत संस्थानच्या वतीने ४१ कोटीचा प्रस्ताव मुख्यमंत्री श्री। ना। अशोकरावजी चव्हाण, म.रा। यांच्या समक्ष प्राधिकरण समीतिचे अध्यक्ष मा.ना। राधाकृष्णजी विखे पाटिल याना सादर करत असतांना ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थानचेअध्यक्ष ह.भ.प। गुरुवर्य ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापुरकर (दादा)

Tuesday, February 2, 2010


ब्रह्मलीन ब्रह्मतेज कैवल्यमूर्ती गुरुवर्य विष्णु महाराज कोल्हापुरकर (गुरूजी)

Monday, June 15, 2009


श्रीक्षेत्र आपेगांव ते पंढरपुर

श्री संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली माता पिता

भव्य दिव्य विराट रथ पालखी विश्वात्मक दर्शन सोहला


Shri Kshetra Apegaon Te Pandharpur

Virat Rath Sohala Patrika

Saturday, November 1, 2008

कार्तिक काला यात्रा सोहला
प्रारम्भ : कार्तिक कृ। ६ मंगलवार
दी। १८/११/२००८
दहिहंदी : कार्तिक कृ। 13मंगलवार
दी। 2
५/११/२००८
ठिकान : माँऊली जन्मभूमि आपेगांव
ता पैठन जी। औरंगाबाद

Sunday, September 21, 2008

ज्ञानेश्वर महाराज मंदिर हेच माऊलींचे वाङमय

ज्ञानेश्वर महाराज मंदिर हेच माऊलींचे वाङमय

संत सम्राट विश्वात्मक, विश्वउध्दारक, विश्वभूषण, योग्यांची माऊली, ज्ञानांचे राजे त्रिजगताची माता ज्ञानराज माऊली मंदिर हेच माऊलींचे अक्षर वाङमय. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई या चारही भावंडांची जन्मभूमी आपेगांव या भूमीचे वैशिष्ट्ये व मंदिर वैशिष्ट्ये लिखान करतांना मन अगदी भरुन येते.
श्री.ह.भ.प.श्र्रो.ब्र.नि.वे.शा.सं.कैवल्यमूर्ती विष्णु महाराज कोल्हापूरकर (गुरुजी) यांनी या जन्मभूमी व मंदिर कामासाठी संपूर्ण आयुष्य अथांग परिश्रमातून केलेले कार्य अंगावर शहारे आणणारे असे आहे. ""तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे'' या संत वचनाने माऊलींची जन्मभूमी आपेगांव का आळंदी? इथ पासून ते आज माऊलीचे सुबक सुंदर असे संपूर्ण हेमाडपंथी (दगडाचे) बांधकामापर्यंत स्वत:च झगडत आहे. ज्या विश्ववंदे, विश्वमाता, विश्वकल्याणाचे अर्थ त्यांच्यामनी अखंड तेवत चंद्र,सूर्य,पृथ्वी असे पर्यंत ज्योत जपली,जपतात त्या भूमीला व माऊलींच्या माता पिता यांना वाळीत काढले असे वाटत नाही. कारण शासन दुर्लक्षित ही भूमी परंतु गुरुवर्य विष्णु माऊली त्याच जोमाने कार्य करत आहे. म्हणून आज 19 कोटी 25 लाखाचे भव्यदिव्य मंदिर उभारत आहे. ते सर्व सामान्य जनतेपासून विद्वानांपर्यंत प्रत्येक अभ्यासकांना ज्ञान,विज्ञान या मंदिरातून मिळेल ही संकल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमीचा वाद जन्मसप्तशताब्दी निमित्त उफाळून आला. बुध्दिवादी पुणेकरांनी जन्म आळंदीत झाला. जन्मसप्तशताब्दी तेथेच झाली पाहिजे असे शासन दरबारी लावून धरले. आपेगांव पक्षातर्फे श्री.ह.भ.प.श्र्रो.ब्र.नि.कैवल्यमूर्ती विष्णु महाराज कोल्हापूरकर (गुरुजी) व संत वाङमय संशोधक प्रा.कृष्णा गुरव (सर), श्री.ह.भ.प.शंकर महाराज खंदारकर, श्री.ल.रा.पांगारकर असे मोजकेच लोक होते. शेवटी कितीही तर्क वितर्क बुध्दीवाद विकृतीचा कळस म्हणजे सुपारी देऊन मारणे पर्यंत करुन पाहिले. हे सर्व वितंटवाद ठरले कारण ईश्वरी कार्य करत असतांना गुरुवर्यांच्या पाठीशी सद्‌गुरु ब्र.भू.ह.भ.प.थोर संत वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांचे आशिर्वाद व गुरुआज्ञा ""विष्णु तू ही ज्ञानेशांची जन्मभूमी सिध्द करुन मायभूमीची सेवा कर'' त्यामुळे शेवटी असत्य ते असत्यच राहीले व सत्य उघडकीस आले. नामदेव महाराजांच्या स्पष्ट प्रमाणाद्वारे
मायभूमी पाहू यांची आम्ही डोळा। चलावे गोपाळा सहजासहज।।
भक्त त्रिंबकपंत मूळपुरुषादि । तयाची समाधी आपेगांवी।।
आपेगांवी आले देव ऋषिश्वर। उतरले भार वैष्णवांचे।।
धन्य यांचा कुळ धन्य यांचा वंश। धन्य यांची कुशी योगीराज।।
नामा म्हणे आम्हा दाविले नारायणे। झाले चौघे जणे याच क्षेत्री।।
ज्ञानराज माऊलींची जन्मभूमी सिध्द झाली. सन 1975 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.स्व.शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते शासनमान्य श्री.संत सम्राट ज्ञानराज माऊली जन्मसप्तशताब्दी जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगांवी मोठ्या थाटामाटात साजरी झाली. त्याच प्रसंगी शासनाच्या वतीने माऊलींची जन्मभूमी आपेगांव,ता.पैठण,जि.औरंगाबाद हीच आहे असे जाहिर करण्यात आले. या सोहळ्यासाठी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांनीही आपला शुभसंदेश पाठविला.
आपेगांव हेच भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचे मुळ गौरवस्थान आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब, स्वागताध्यक्ष मा.ना.डॉ.रफीक झकेरीया,महसूल मंत्री म.राज्य,मा.ना.रामनाथजी पांडे शिक्षणमंत्री, संत वाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक बाळासाहेब भारदे, श्री.ह.भ.प.श्र्रो.ब्र.नि.कृ. वे.शा.सं.गुरुवर्य विष्णु महाराज कोल्हापूरकर (गुरुजी), अर्वाचिन प्राचीन संत वाङमयाचे संशोधक प्रा.कृष्णा गुरव (सर) या महोत्सवाचे मुळ प्रेरक होते.
त्यानंतर गुरुवर्यांनी आपेगांवी चारही पिठांचे शंकराचार्य गुणवान वादक,गायक सर्वांना एकत्र करुन मुक्ताबाई जन्मसप्तशताब्दी साजरी केली. अनेक संत,विद्वान,मंत्री महोदय सर्व थरातील जनतेला माऊलींचे दर्शन घडविले. सन 1968 साली ज्ञानेश अध्यात्म विद्यासंस्था स्थापन केली. आज पर्यंत लाखो विद्यार्थी ज्ञान घेऊन अनेक स्तरावर विद्यार्थी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. संस्थेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण तसेच अध्यात्मिक शिक्षण,संगित शिक्षण मोफत दिले जाते. ""इवलेसे रोप लावियले द्वारी। त्याचा वेलू गेला गगनांतरी'' या संत वचनाप्रमाणे आज हे रोपटे फुला फळाला आले आहे. सन 1995 पासून गुरुवर्यांनी चारही भावंडांच्या माता श्रीगुरु रुख्मिणी आई पिता विठ्ठलपंत नावाची ज्योत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरविली. याचा एकच उद्देश ज्या मातापित्यांच्या उदरी चार देव जन्माला आले ज्यांनी विश्र्वात्मक ज्ञानज्योतीने विश्वाला अज्ञान अंध:कारातून ज्ञानज्योतीकडे नेले. ज्यांच्या नावाने आज पर्यंत शास्त्री,पंडीत,महाराज,बुवा स्वत:चे व इतरांचे पोट भरतात. परंतु ज्यांच्या माता पित्यांचा उच्चारसुध्दा होत नाही. हे शल्य मनामध्ये सारखे टोचत होते. म्हणूनच त्यांच्या नावाने ज्ञान जपयज्ञ व ज्ञानराज माऊलींचे भव्यदिव्य 19 कोटी 25 लाखांचे सुंदर,सुबक मंदिर मायभूमीत "माता पिता मुक्तमुदी' साकारत आहे. त्यानिमित्ताने माऊलींचा गर्भ गाभारा, सभा मंडप, भक्त त्रिंबकपंतांचे मंदिर, अजाणवृक्ष सुवर्ण पिंपळ ओटा, गोदावरी गंगेवर घाट या कामाचा शुभारंभ होत आहे. भक्त त्रिंबकपंतांच्या संजीवन समाधी मंदिरापासून होत आहे. अध्यात्मिक कारणही तसेच आहे. संत नामदेवांच्या अभंगातून "भक्त त्रिंबकपंत मुळपुरुषादि। तयाची समाधि आपेगांवी' या प्रमाणे भगवान परमात्मा भक्तवत्सल पांडूरंग परमात्मा यांची बहात्तर पिढीची भगवत भक्ती या घराण्याची थोडे या मुळ पुरुषाबद्दल लिहित असतांना शके 1129 ते 1135 च्या काळात जावे लागेल.
भक्त त्रिंबकपंतांचे वडील गोपाळपंत जावळे (कुलकर्णी) त्रिंबकपंतांनी देवगिरी (देवगड) येथे जाऊन वेद अध्ययन केले. देवगिरीवर असणारे जाधवराजे (सिंव्हल) यांच्या सेवेत सात वर्ष देश अधिकाऱ्याचे बीडला काम केले. त्याकाळचा सार्वभौम राजाचा जैत्रपालाने (जैतुगीने) शके 1129 प्रभोनाम संवत्सरे चैत्र शुक्ल 5 इंदुवासर प्रात:काल घटी 11 यावेळेस ही राज अज्ञा त्रिंबकपंतांना दिली.
त्याच प्रमाणे त्रिंबकपंतांनी दोन वर्ष सुखाने राज्यकारभार पाहिला. पुढे तीन वर्ष दुष्काळ पडून त्रिंबकपंतांचे फार नुकसान झाले. लोकांना जगवण्यात राज्याचा पैसा संपला. स्वत:चे सर्व द्रव्य खर्ची पडले. त्यांनी स्वत:ची इस्टेट विकून प्रजेचे पोषण केले. त्रिंबकपंतांना दोन मुले होती. गोविंदपंत व हरिहरपंत, वडील मुलगा गोविंदपंत अपेगांवचे कुलकर्णीपणाचे काम पहात होता. इकडे देवगिरीच्या जैत्रपालाचे मृत्युनंतर त्यांचा पुत्र सिंघन (सिंव्हल) राजा गादीवर बसला. शके 1132 त्याने त्रिंबकपंतांचा लहान मुलगा हरिहरपंत यास दुय्यम सेनापतीपदी नेमले. पुढे दक्षिणेत देवगिरीपासून चाळीस कोसावर बालाघाट आहे. त्यास करंजे आडनावाचे देशमुख राहत असत. त्यांनी सरकार विरुध्द बंड पुकारले. राजद्रोह मांडला. तीन हजार लोक साथीला घेऊन वारेमाप वाटसरुंची व खेडोपाड्याची लयलुट करु लागला. त्याला आळा घालण्यासाठी देवगिरी नराधिप सिंघनराज महाराज यांनी शके 1135 यांची हरिहरपंतांना राजअज्ञा पत्र पाठविले.
त्या अज्ञेनुसार जसवंतसिंह,हरिहरपंत व त्यांचे वडील त्रिंबकपंत देशमुखांशी लढाई करुन बंड मोडले. लढाईच्या जबर घावांनी हरिहरपंतांचा देह धारातीर्थी पडला. होतकरु पुत्राचा लोप झालेला पाहून त्रिंबकपंतांना वैराग्य प्राप्त झाले. त्यांनी नौकरीचा राजीनामा दिला व परत आपेगांवी येऊन गोदावरी गंगेकाठी बारा वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेला गोरक्षनाथांनी त्रिंबकपंतांना अनुग्रह दिला. पुढे तिन्ही देव प्रसन्न झाल्यावर मागणीसाठी आज्ञा केली असता. त्रिंबकपंतांनी देवापुढे मागणे मागितले ते विश्व कल्याणासाठी चंद्र,सूर्य,पृथ्वी असे पर्यंत संजीवन स्वरुपातून माझे कुळात मृत्यु हा शब्द नको व तुम्हाला माझ्या कुळात जन्म घ्यावा लागेल. पुढे त्रिंबकपंतांना गोरक्षनाथांनी स्वत: संजीवन समाधी दिली. मोठा मुलगा गोविंदपंत पंढरपूर वारी करीत असतांना वृध्दापकाळाने सोलापूर येथे सिध्देश्वर मंदिरात अत्यावस्थस्थिती पांडूरंगाचा मनात धावा करीत वारी अर्धवट राहिल्याची खंत मनात बाळगत प्राण कंठाशी येऊन ईश्वराचा धावा करत होते. तेथे प्रत्यक्ष पांडूरंगाने भेट देऊन त्यांना स्वत: संजीवन समाधी दिली. याचा संपूर्ण उल्लेख "इंडियन गॅझेट'मध्ये 193 पानावर आहे. पुढे विठ्ठलपंत हे सर्व आपेगांवचा कुलकर्णीपणा सांभाळत होते. मनात ईश्वराची ओढ सर्व विद्या पारंगत आणि एके दिवशी घरातून निघून पुढे काशी यात्रा केली. आळंदी येथे सिध्देश्वर मंदिरात वास्तव्यास असतांना सिध्देश्वरांचा स्वप्नदृष्टांत माता रुख्मीणीशी लग्न परत सन्यास. गुरुआज्ञेवरुन परत गृहस्थाश्रम, आळंदी येथे वास्तव्य असतांना तेथील ब्रह्मवृंद्यांनी सिध्दोपंतांना (सासरे) बजावून सांगितले, सन्याशी परत गृहस्थाश्रम कोणाच्या आज्ञेने स्वीकारला त्याचे तोंड पहाणे नाही. तो भ्रष्ट आहे. त्याला येथून हाकलून लावा. नाहीतर समाजातून तुम्हाला दूर जावे लागेल. हे सर्व वृत्तांत विठ्ठलपंतांना समजल्यावर विठ्ठलपंत रुख्मीणीआईसह आळंदीहून आपेगांवी आले. शुध्दीपत्रासाठी खूप वणवण केली. जीवाची खूप परवड झाली. समाजात मान नाही. आत्मतत्वातून ईश्वरचिंतन फक्त. विश्वकल्याणासाठी जन्मघेणाऱ्या ईश्वर अवतारासाठी जगणे आले. ""ऐशी बारा वर्ष क्रमिली निघूते। झालीसे संतती चौघे जण।।'' बारा वर्ष कष्टमय जीवन जगत वयाच्या 46 व्या वर्षी कैलासपती भगवान शंकर निवृत्तीनाथ रुपाने माता रुख्मीणीआईच्या कुशीत जन्मले, ""सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ती दातार।।'' शके 1195 श्रीमुख संवत्सर माघ वद्य प्रतिपदा प्रात:काळी वार सोमवार जन्म घेतला. पुढे दोन वर्षांनी ज्यांच्यासाठी देव,देवांगणा,ऋषिमुनी,सिध्दसाधक अतुरतेने वाट पहात होते ते शके 1197 युवा संवत्सरनाम श्रावण वद्य अष्टमी गुरुवार,रोहिणी नक्षत्र रात्री बारा वाजता चंद्र उदयाच्या समयाला शीतल शांत स्वरुपातून विश्व कल्याणार्थ श्रीकृष्ण भगवान विष्णु ज्ञानराज रुपाने जन्मले. ""विश्व तारावया आले। खेचर वंदीतो पाऊले।।'' माऊलींचे जन्मनांव विद्याधर, वृषभ राशी, शुक्र राशाधिपती, सर्प योनी, मनुष्य गण, इष्ट घटी पंचेचाळीस, जन्म तारीख 15/08/1275 रोजी ""विठ्ठल रुख्मिणीच्या कुशी अवतरले ऋषिकेशी''
या प्रमाणे माऊलींची जन्म लग्न कुंडली. पुढे दोन वर्षांनी ब्रह्मदेव सोपान काका मानव रुपाने जन्मले. ""ब्रह्मा सोपान तो झाला। भक्ता आनंद वर्तला।।'' शके 1199 ईश्वरनाम संवत्सरे कार्तिक शुध्द पोर्णिमा रविवार, एक प्रहर रात्र. पुढे दोन वर्ष अंतराने आदिशक्ती संत मुक्ताई स्वरुपातून प्रगटल्या. कारण मानव देहात आल्यानंतर संसाराला गती कन्ये शिवाय लाभत नाही. म्हणून त्रिंबकपंतांनी वर मागून घेतांना कुळात कन्या पाहिजे हे मागितले होते. ""कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयांचा हरिक वाटे देवा।।''
शके 1201 प्रमाई नाम संवत्सर अश्विन शुध्द प्रतिपदा दोन प्रहरी मध्यान्हकाळी शुक्रवारी जन्माला आल्या. नवरात्रातील घट स्थापनेच्या दिवशी म्हणजे शक्ती अवताराच्या वेळी जन्मशक्ती अवतार रुपी घेतला. पुढे माता पिता ही चारही भावंडे आपेगांवी रहात होते. कारण आपेगांवला फक्त एकच ब्राह्मण घर होते. त्यामुळे इतर मानसिक त्रास रोज नव्हता. विठ्ठलपंतांनी आळंदी,पैठण,काशीच्या ब्रह्मवृंद्यांकडे अनेक चकरा मारल्या. मुलांचे मौंजीबंधन करायचे शुध्दीपत्र पाहिजे, पण शुध्दीपत्रापेक्षा त्रासच जास्त होत होता विठ्ठलपंत ब्रह्मज्ञानी होते. विद्वान होते. ईश्वर अवतार आपल्या उदरी जन्मण्याची जाणीव होती. त्याचे हातून विश्व कल्याण होणार होते. याचा दृढ विचार करुन एके दिवशी रुख्मिणी मातेला सर्व वृत्तांत सांगितला. मातेचाही तेवढा अधिकार होता पण शेवटी मातृहृदय होते. काही क्षणापुरता मुलांच्या पालनपोषणाचा विचार येई कारण मुक्ताई फक्त तीन वर्षाची होती आणि एके दिवशी हृदय दगडासारखे बनवणे भाग होते. कारण विश्वात काही मोजकेच संस्कृत जाणणारे ते पण अभिमानी त्यामुळे जी भगवद्‌गीता विश्वातील प्रत्येक मानवाला ईश्वरीय ज्ञान होणेसाठी व मानव सुखासाठी निर्माण झाली. त्याचा उपयोग काय? व ती भगवद्‌गीतारुपी अमृत सर्व सामान्य प्राणीमात्रांपर्यंत पोहोच होऊन त्यांना कृतीत उतरले पाहिजे व ती ईश्वरीय शक्ती आपल्या उदरात जन्म घेतला. आपण जर त्यांचे संगोपणाचा विचार करुन त्यांचे भोवती वलय राहून थांबलो तर विश्व मानवाला अज्ञानरुपी गडद अंधारात स्वत: आपण ढकलून दिल्या प्रमाणे होईल. पण मनात परत त्या लहान लहान गोंडस सुप्रकाशित बालकाकडे पाहिले की, मात्र हृदय जागे होत होते. तेही स्वभाविकच होते. कारण जन्माला आलेल्या बालकांना फक्त मायेचा हात अंगावर फिरवण्यावाचून काही करु शकलो नाही. आणि शक्यही नव्हते. त्याला सर्व जबाबदार म्हटले तर समाज व त्यातील अनिष्ट चालीरुढी मग प्रश्न? मग ज्यांनी आपल्याला लाथाडलं, दगड, शेण मारले वाळीत टाकले त्यांचेसाठी आपण का म्हणून हे सर्व करावे? नाही आपली संस्कृती आपण ईश्वरीय भक्तीत ज्या कुळात जन्म घेतला त्याचे कार्य करायचे ते जर आपल्यामुळे अर्धवट रहात असेल तर या जगण्याला अर्थ काय? किती त्यागी अंत:करण पिळवटून काढणारा विचार माता रुख्मिणी आईच्या मनातील विचार पिताजी विठ्ठलपंतांना वर्तत होती. विठ्ठलपंत एकाग्रचित्र करुन ऐकत होते. सुन्न शांत दगडासारखी मूर्ती करुन बसले होते. आणि शेवटी एक शब्दात विठ्ठलपंतांनी माता रुख्मिणीअाईला सांगितले आज रात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी आपल्याला आपेगावातून जावे लागेल. विचार संपला आता वाचकांच्या मनात येईल त्यांनी देहांत प्रायश्चित दिले म्हणून त्यांनी जळात उड्या घेतल्या. काहीचे म्हणणे आत्महत्या केली. थोडा विचार करा. कारण ""मनुष्य देही जाण। ज्ञान अधिक असे।।'' मानवाला इतर प्राण्यापेक्षा ज्ञान दिले आहे. याचा उपयोग जर सत्यत्वासाठी केला तर वरील अनेकांचे विचार म्हणजे थोतांड फापट पसारा आहे हे समजेल! कारण ज्यांचे उदरी चारही देव जन्माला आले. ते स्वत: विद्वान पंडीत होते. संस्कृती जपणारे होते. रामानंदासारखे सद्‌गुरुचे आशीर्वाद पाठीशी होते. त्यांना देहांत प्रायश्चित्त देणारे कोण? काय अधिकार पोहचत होता? जर अधिकार किंवा ग्रंथ आधार होता तर? पुढे ज्ञानराज माऊलींनी श्रीक्षेत्र पैठण येथे रेड्यामुखी वेद बोलवला ""म्हैशीपुत्रा मुखी। बोलविली श्रृती ।।'' येथे अवर्जून हे प्रमाण देत आहोत. कारण "रेड्यामुखी वेद बोलविला' या प्रमाणाने काही बुध्दीवादी ज्ञानी समजणारे गडद अज्ञानी विपर्यास लावतात की, रेड्यासारख्या बुध्दीच्या मानवाला बोलायला लावले म्हणून पुढे ज्ञानराज माऊलींनी नाथांच्या आवारात वरील प्रमाण टाकले. आता तुम्ही विचार करायचा कितीही विज्ञान प्रगती झाली तरी म्हशीला मानवरुपी पुत्र जन्माला येऊ शकेल असे शक्यच नाही. आणि मग त्यावेळेस त्याच ज्ञानी लोकांनी रेड्याच्या मुखातून निघणारे वेद आपल्या दप्तरी बरोबर का चूक तपासले याचाच अर्थ तुमचे तुम्हाला विश्वास नव्हता. मग आमच्या माता पितांना देहांत प्रायश्चित्ताचा आदेश देण्याचा काय अधिकार? तर विश्व कल्याणासाठी या दोघांनी या मायभूमीत विचार केला हा देह पंचतत्त्वाचा याला नष्ट करणेसाठी कोणत्या तरी एका तत्वाचा आधार घ्यावा लागेल म्हणून रात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ""तात आणि मात गेलेशी येथूनी । तेंव्हा आम्ही लहान पांडूरंगा।।'' ना.म.मुक्ताईने वर्णन केले प्रमाणे विठ्ठलपंत बाहेर पडले. रुख्मिणी माता घरात होत्या मुक्ताईला मांडीवर घेऊन स्तनपान करुन मुखावरुन हात फिरवित होती. कंठ दाटून आला होता. हृदय पिळवटून निघत होते. आपण या लहान लहान बालकांना सोडून जात आहोत. त्यावेळेला मुक्ताई तीन वर्षाची होती. पाच वर्षाचे सोपानदेव सात वर्षांचे माऊली आणि नऊ वर्षांचे निवृत्तीनाथ. पाठीमागे काय होतं, असा हा समाज सन्याश्याची मुले म्हणून तुच्छ समजणारा, पांघरायला आकाश, अंथरायला धरती, खायला हवा एवढाच काय तो आधार, मातेचे अंत:करण छिन्न विछिन्न झाले होते. शरीराचे तुकडे तुकडे झाले होते. पण ""पती जिच्यामते। अनुसरुनी पतीव्रता। अनायासे आत्महिता। भेटे जी ते।।'' ज्ञा.अ.16 ओ.456, पतीव्रतेचे पती विषयी व्रतच असे आहे. मनविषिन्न करणारा प्रसंग होता. एका कवी मनाने त्यावेळचे वर्णन करतांना. ""चालली माता देवांची। रडते तरुवर रडती धरणी। रडते आकाश पाषाणालाही पाझर फुटतो।।'' असा हा प्रसंग घडत असतांना बाहेरुन हळूच पण कठोर शब्दात आवाज आला. थांब रुख्मिणी मी निघालो तुला मायेचा पडदा दूर करता येणार नाही. विठ्ठलपंतांचे करारी वाक्य मातेने ओळखले आणि मातेने मुक्ताईला कुरवाळले व ज्ञानराजाच्या डाव्या पायाच्या करंगळीला हात लावला. आत्म्याशी संवाद साधत असतांना मातेने आज्ञा केली, ""हे ज्ञाना या विश्वाला सांभाळ''. आणि माता विठ्ठलपंतांच्या मागे निघून गेली परत येण्यासाठी नाही. लिखाण करत असतांना क्षणभर हात थरथरले, लेखणी बंद पडली किती मोठा विचार करुन मातेने स्वत:च्या छातीवर दगड ठेवला असेल कल्पना करवत नाही.
पुढे एक वर्ष चारही भावंडे आपेगांवला राहिली, ""निवृत्ती,ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न। सांभाळी सोपानमजलागी।।'' अशा प्रकारे विश्वात्मक माऊलींच्या मातापित्यांच्या नावाने हे चिरंतन राहणारी (हेमाडपंथी) दगडाची वास्तु भव्यदिव्य प्रमाणात उभारत आहेत. मंदिराचे संकल्पना करत असतांना सद्‌गुरु विष्णु माऊली प्रेरणेने संकल्प केला माझ्या माऊलीच्या मंदिरासारखे जगतात कोठेही त्या सारखे असता कामा नये. माऊलीचे दर्शन घेऊन सद्‌गुरु माऊलीचे दर्शन आशीर्वाद घेतला. गुरुमाऊलींनी आशीर्वाद दिला,""तुम्ही जे जे कराल। ते ते विठ्ठला साजिरे।।'' या महान आशीर्वादातून व आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ज्ञानराज माऊली जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी रोजी मंदिराचे भूमीपूजन केले.
मंदिराचे वैशिष्ट्ये
* संपूर्ण मंदिर व मंदिराचे परिसरातील सांस्कृतिक हॉल हे सर्व हेमाडपंथी दगडाचे बांधावयाचे.
* मंदिराचा कळस चौतीस किलो सुवर्णाचा करावयाचा.
* गोदावरी गंगेवर 200 मिटर लांबीचा सुंदर घाट तोही हेमाडपंथी बांधावयाचा, मंदिरात येणेसाठी घाटावरुन वरती 108 पायऱ्या त्या सरळ ज्ञानराज माऊलीचे प्रपितामह (पणजोबा) भक्त त्रिंबकपंताचे दर्शन प्रथम तपस्वी त्रिंबकपंतांचे दर्शन तपानेच झाले पाहिजे. सहज माऊली जप करत 108 पायऱ्या चढल्या नंतर त्याचे वैभव ""तपाचे वैभव। तपिनिला अमुप।।'' तपानेच दर्शन पुढे सभामंडप (घंटा मंदिर) त्याला सहा पायऱ्या कि ज्या चढल्या नंतर मानव शरीरातील षड्‌विकार निवृत्ती होऊन घंटा मंदिरात प्रवेश 22 - 22 चा भव्य सभा मंडपात शांत चित्ताने प्रवेशाने गर्भ गाभारा अर्थात चारही भावंडांचे मंदिर त्याला चार पायऱ्या अर्थात चारी मुक्त्या ज्यासाठी ऋषि मुनी गिरी कपारीत तपश्चर्या करतात त्या सहज जीवाला मिळावयासाठी माऊलींनी हरिपाठात वर्णन केले प्रमाणे,"" देवाचिया द्वारी। उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी । साधियेल्या।।'' अशा त्या सलोकता, समीपता, स्वरुपता, सायुजता चारी मुक्त्या म्हणजे निवृत्ती,ज्ञानेश्वर,सोपान,मुक्ताई,
""स्मरिता निवृत्ती पावलो विश्रांती। संसाराची शांती झाली माझ्या।।1।।
नमिता ज्ञानदेवपावलो विसावा। अंतरीचा हेवा विसरलो।।2।।
सुखाचा निधान तो माझा सोपान। विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई।।3।।
या संत वचना प्रमाणे या मायभूमीत आल्या शिवाय जीवाला विश्रांती नाही. यावेच लागे आपेगांवी. त्या मुर्त्या बनविण्यासठी इजिप्त देशातून मार्बल दगड मागविण्यात येणार आहे. याचे कारणही तसेच त्या दगडावर एक जरी सूर्य किरण पडले तरी संपूर्ण मूर्ती तेजोमय होते. त्या दगडाची अंदाजे किंमत 50 हजार रुपये म्हणजे दोन लाख रुपये फक्त दगडाचे तेथून आणणे व मूर्त स्वरुपात साकारण्याचा वेगळा खर्च. यात सर्वात महान वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशी ज्ञानराज माऊलींनी संजीवन समाधी घेतली तो दिवस कार्तिक वद्य त्रयोदशी 12 वा. 53 मिनिटांनी त्यावेळेस माऊलींच्या अंगावर सूर्यकिरण पडावे या दृष्टीने मंदिराच्या कळसाची रचना वास्तुतज्ञ श्रीयुत माऊली भक्तीनिष्ठ महेश साळुंके हे सर्व कार्य एकनिष्ठतेने करीत आहेत. आज माऊली मंदिर परिसरातील पहिल्या टप्प्याचे अजानवृक्ष सुवर्ण पिंपळ,""जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ। अंगी ऐसे बळ। रेडा बोले।।'' ""अजान वृक्षाची पाने जाण। जो भक्षूनी करील अनुष्ठान। त्यासी साध्य होईल ज्ञान। येथे संशय नाही।।'' या संत प्रमाणाप्रमाणे अंदाजे किंमत 2 लाख 65 हजार रुपये खर्चून पूर्णत्वास आले आहे व दिनांक 14 फेब्रुवारी 2008 रोजी मान्यवरांचे हस्ते भक्त त्रिंबकपंतांचे मंदिर पाया खोदणे समारंभ मोठ्या थाटामाटात होत आहे.
मंदिराच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च अंदाजे 2 कोटी 85 लाख व घाटाचे 2 कोटी 60 लाख इतका येणार आहे. प्रत्येक मानवाने मोठ्या मोठ्या संस्थानिकांनी, उद्योजकांनी, प्रत्येक माऊली भक्तीनिष्ठांनी सर्वांनी मंदिर बांधकामासाठी जास्तीत जास्त मदत करावी. हा माऊलीचा भक्तीनिरोप या स्मरणिका प्रकाशना निमित्त करत आहोत.

आपला भक्तिविनित
श्री.ह.भ.प.अंतरंग शिष्यशिरोमणी
ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा)
माऊली जन्मक्षेत्र आपेगांव,ता.पैठण,जि.औरंगाबाद.
मो.9822836616

नियोजित मन्दिर


Saturday, September 20, 2008

मायभूमी अभंग Maybhumi Abhang

मायभूमी अभंग

Wednesday, September 17, 2008

नूतन मंदिराच्या घाटाचा फोटो

संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी आपेगांव
तालुका पैठन जी। औरंगाबाद
नूतन मंदिराचा घाट
मंदिराचे काम प्रगतिपथावर आहे।